मंत्रालयासमोर धुळ्यातील सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

0
12

मुंबई,दि.11(विशेष प्रतिनिधी)-मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.. धुळ्यातील रहिवासी असलेले बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (11 जून) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत बबन झोटे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. बबन झोटे हे धुळे नगर पालिकेतील कर्मचारी होते, अशी माहिती समोर आली आहे.  धुळे नगरपालिका असताना 1989 मध्ये झालेल्या नोकर भरती प्रक्रियेची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी झोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. झोटे यांनी मनपा सेवेतून कमी करण्यात आले होते.