वैष्णवी स्वयंसहायता समूहाचा दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

0
13

नागभीड,दि.१३ तालुक्यातील चिंधीचक येथील वैष्णवी स्वयंसहायता समूहाला पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण विकास व पंचायत राज केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर व ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांचे हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने नकतेच दिल्लीत गौरव करण्यात आले.
वैष्णवी स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्ष सौ. ताराबाई गायधनी, उपाध्यक्ष सौ. वर्षा लांजेवार व सचिव सौ. सारिका सर्मथ, प्रभारी जिल्हा व्यवस्थापक (उपजिविका) मोहीत नैताम यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह असे राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून राज्यात वैष्ण्वी स्वयंसहायता समुहाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक या प्रसंगी केंद्रिय मंत्र्यांनी केले आहे.
सन २0१0 मध्ये नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथे वैष्णवी स्वयंसहायता समुहाची स्थापना करण्यात आलेली आहे. बारा महिला सदस्यांचा या समुहात समावेश आहे. स्थापनेच्या प्रारंभेपासून तर आजपयर्ंत या समुहाने गटातील महिलांच्या कुटूंबांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहे. गटातील महिलांच्या कुटूंबांना शेतीसाठी लागणारा कर्ज असो किंवा कुटूंबांची आर्थिक परिस्थिती सबळ करण्यासाठी लघु उद्योग करण्याची किमया असो यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच तालुका व जिल्हास्तरावर या समुहाचा उत्कृष्ट गट म्हणून या अगोदही गौरव करण्यात आलेला आहे, हे विशेष!