काश्मिरात दाेन जवान, एका संपादकाची गाेळीबारात हत्या

0
15

श्रीनगर(वृत्तसंस्था),दि.15– ईदच्या आधीच गुरुवारी काश्मिरात अतिरेक्यांनी दोन मोठ्या कारवाया केल्या. वेगवेगळ्या घटनांत दोन जवानांसह एका संपादकाची हत्या झाली. सुट्टी घेऊन ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या लष्कराचा जवान आैरंगजेब याचे शोपियांमध्ये अपहरण करून नृशंस हत्या करण्यात आली. तो हिजबुलचा अतिरेकी समीर टायगर यांचे एन्काउंटर करणाऱ्या टीममध्ये होता. गुरुवारी अपहरणानंतर रात्री आठ वाजता गोळ्यांंनी चाळणी झालेला औरंगजेबचा मृतदेह सापडला.

दुसरीकडे, श्रीनगरमध्ये इंग्रजी वृत्तपत्र रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिरेक्यांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यात त्यांच्यासह एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. दरम्यान, बांदीपुरात चकमकीत जवानांनी दोन अतिरेक्यांना टिपले, तर एक जवान शहिद झाला. शोधमोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी गाेळीबार सुरू केला. त्यांंना चाेख प्रत्त्युत्तर देण्यात अाले. उशिरापर्यंत ही कारवाई सुरू हाेती.

काश्मीर खाेऱ्यात शांतीसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी सायंकाळी ७.१५ वा. अाॅफिसमधून बाहेर पडले. इफ्तार पार्टीला जाण्यासाठी ते गाडीत बसले तेवढ्यात अतिरेक्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गाेळीबार केला. या हल्ल्यात बुखारींसह एका पाेलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही माहिती कळताच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती रुग्णालयात पाेहाेचल्या, बुखारींना पाहून त्यांना रडू काेसळले. बुखारींचे भाऊ ‘पीडीपी’चे नेते व मंत्री अाहेत. पाेलिसांनी नाकाबंदी व शाेधमाेहीम सुरू केली. उशिरापर्यंत एकाही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती. हल्लेखाेर चाैघे जण असल्याचे सांगितले जाते.