गंगाझरी वनपरिक्षेत्रात अस्वलाचा मृत्यू

0
11

गोंदिया दि.१६ : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे प्रकरण सुरू आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारेच्या स्पर्शाने वन्यप्राण्यांची हत्या करण्यात येत आहे. त्यातच (दि.१५) पुन्हा गंगाझरी वनपरिक्षेत्रातील खळबंदा तलाव परिसरात एक अस्वल मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.अस्वलाचा मृत्यू नैसर्गिक की त्याची शिकार करण्यात आली यावर शंका असली तरी वन विभागाने मात्र गंभीर आजाराने अस्वलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.गंगाझरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या खळबंदा तलाव परिसरात सकाळी ११.३० वाजेदरम्यान अस्वल मृतावस्थेत आढळून आला.वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी केल्यानंतर अस्वलाचा मृत्यू कॉर्डिया अटॅकने झाल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी आर.ओ. ब्राह्मणकर यांनी दिली. जिल्ह्यात यापूर्वीही अनेक वन्यप्राणी मृतावस्थेत आढळून आले आहेत. यातील अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू विद्युत तारेच्या प्रवाहाने झाल्याचेही समोर आले आहे. खळबंदा येथे  अस्वल मृतावस्थेत आढळून आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर अस्वलाचा मृत्यू आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्या अस्वलाला त्याच वनपरिक्षेत्रात जाळण्यात आले. अस्वलाचा मृत्यूने मात्र परिसरात विविध चर्चांना पेव फुटले आहे. या घटनेने पुन्हा एकदा वन्यजीव संरक्षणाच्या कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.