विनयभंग करुन व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तीन आरोपींना अटक

0
15

तिरोडा,दि.16 : तालुक्यातील इसापूर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून विनयभंगाचा व्हिडीओ तयार करून तो व्हाट्सअप वर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी तिरोडा येथील तीन युवकांना तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील इसापूर येथील फिर्यादी १५ वर्षीय मुलगी २० एप्रिल रोजी चुरडी रोड जवळील एका झाडाखाली आपल्या मैत्रिणींसह नास्ता करीत असतांना तिरोडा येथील ३ युवकांनी तिचा विनयभंग करून संगनमताने विनयभंगाचा विडिओ तयार केला.त्यानंतर तो व्हाट्सअपवर व्हायरल करून बदनामी करून मारहाणाची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादवी कलम ३५४ (ड) ५०४, ५०६, ३४ RW ४-६-८-१०-६७ ITC कलम १०,२००८ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणात हर्षल आत्माराम सरोदे (२४) नेहरू वार्ड तिरोडा,भुवन उमानंद नागरीकर व नयन सुनील नागरीकर दोन्ही राहणार भूतनाथ वार्ड तिरोडा यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे.