रामनगर ठाणेदार बदलताच चोरांची नव्या ठाणेदाराला सलामी

0
36
सेवानिवृत्त प्राचार्य बघेले यांच्या घरातील खिडक्याची चोरट्यांनी तोडलेली ग्रील

अंगुर बगीचा परिसरातील सेवानिवृत्त प्राचार्य बघेलेंच्या घरी ग्रील तोडून चोरीचा प्रयत्न

गोंदिया,दि.१७ : गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनाकंडे बघता कुठेतरी पोलीस प्रशासन त्यावर अंकुश लावण्यात अपयशी झाल्याचेच दिसून येते.गेल्या अनेक महिन्यापासून गोंदिया शहर,गोंदिया ग्रामीण व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुले आम सट्टापट्टी व जुगार सुरु असतानाही पोलीसांनी मात्र त्याकडे कानाडोळा केला.त्यातच रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.आज रविवारच्या पहाटेच्या सुमारास अंगुरबगीचा पांडे लेआऊटमधील सेवानिवृत्त प्राचार्य पी.एफ.बघेले यांच्या घरातील ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.श्री बघेले हे आपल्या घरीच गाढ झोपेत असताना चोरांनी चोरीचा प्रयत्न केला आहे.चोरट्यांनी काही साहित्य घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्या बॅगा काही अंतरावर फेकून पळ काढला.

गेल्या काही दिवसापासून न्यु लक्ष्मीनगर,गजानन काॅलनी,शिवनगर,अंगुर बगीचा व पांडे काॅलनी,हनुमाननगर परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत.यात काही ठिकाणी तर दिवसाच चोरीचा प्रयत्न झालेला आहे.रामनगरचे ठाणेदार देशमुख यांची बदली होताच नव्या ठाणेदार रुजु झाले.नव्या ठाणेदार रुजु झाल्यानंतर अंगुरबगीचा भागात आम्ही सक्रीय असल्याची सलामीच चोरांनी दिली आहे.याचपरिसरात मोठ्याप्रमाणात गैरकृत्य असलेली कामे सुरु असून काही युवक हे दादागिरी करीत सायंकाळच्या सुमारास अतीवेगाने दुचाकी चालवून प्रवासांना त्रास देत असल्याचेही बोलले जाते.त्यातच चौरागडे मेडीकल चौकात मोठ्याप्रमाणात वाहतुक विस्कळीत होत असून राज्यपरिवहन आगाराची बस सुध्दा मुख्य चौकात प्रवासासाठी थांबवली जाते त्यामुळे अपघाताची शक्यता वळावली आहे.तर काही आटोचालकांनी अगदी वळणरस्त्यावर कब्जा केल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.आधी या चौकात रात्रीला पोलीस गस्तीवर असायचे दिवसाला ही पोलीस फेरफटका मारत असताना दिसायचे मात्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून हे चित्र दिसून येत नाही.