‘व्यवस्थेशी लढताना रत्नहाराची अपेक्षा नाही”-डॉ. आ. ह. साळुंखे

0
21

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे भावोद्गार; विविध संघटनांतर्फे अमृतमहोत्सवी सत्कार

नागपूर,दि.१८-सध्याची शासनव्यवस्था ही शोषकाची प्रतीक असून, या व्यवस्थेकडून मला रत्नहाराची अपेक्षा नाही.ङ्कप्रत्येकात चांगले गुण असतात. तो या जातीचा की त्या जातीचा, यापेक्षा माणूस तपासून घेतला पाहिजे. आज जातीजातींत दुरावा निर्माण झाला आहे. माणसे दुरावत आहेत. त्यांना जोडण्याची कामे झाली पाहिजेत. हे घडले तर देशहिताचे काम होईलङ्क, असे भावोद्गार ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी काढले..
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विविध सामाजिक संघटनांतर्फे रविवारी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. साळुंखे भावूक झाले होते. विदर्भाने दिलेल्या भरभरून प्रेमामुळे गहिवरल्याचा उल्लेख त्यांनी केला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे होते. स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यसभा खासदार व अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, महात्मा फुले ग्रंथप्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. हरी नरके, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, वनराईचे गिरीश गांधी, सत्यशोधक प्रबोधनकार सत्यपाल महाराज, राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ. सय्यद रफिक गफूर, मधुकर मेहेकरे, डॉ. सुनील तलवारे, रमेश बोरकुटे, ऋतायुष, नागेश चौधरी, प्रभाकर पावडे, डॉ. अशोक चोपडे आदी उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, सध्याची शासनव्यवस्था ही शोषकाची शासन व्यवस्था आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक व महिलांवर सातत्याने अत्याचार वाढत आहेत. या शोषक व्यवस्थेच्या विरोधात मी लढा देत आहे. हा लढा सुरूच राहणार आहे. ज्या व्यवस्थेच्या विरोधात मी लढा देत आहे, त्याच व्यवस्थेने माझा गौरव करावा, अशी अपेक्षा मी ठेवू शकणार नाही. मला मान-सन्मानाची कोणतीही अपेक्षा नाही.ङ्कङ्कङ्कपद व पुरस्कार मिळावे म्हणून इतरांच्या गळ्यात पडण्यापेक्षा समाजातील माणसाच्या पायाची धूळ कपाळी लावणे याचा अभिमान यानंतरही राहील. मला काही मिळावे, अशी अपेक्षा कधी ठेवली नाही. मला चांगल्या लोकांचा सहभाग लाभला. प्राथमिक शिक्षणात चांगले शिक्षक भेटले तर एक ताकदवान पिढी निर्माण करता येणे शक्य आहे. आयुष्य समजून घेणारी माणसे निर्माण झाली तर, जिद्दीने व चिकाटीने माणसे उभी करता येतात. दुर्दैवाने आज मोजक्यांची उंची एव्हरेस्टएवढी वाढत आहे. खरेतर सर्वसामान्यांची उंची वाढणे अपेक्षित आहे. प्रत्येक माणसाची उंची वाढली तरच प्रतिमा प्रभावीपणे फुलेल, अशी अपेक्षा आहे.ङ्क
डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, ङ्कलोकशाही समाजाला उन्नत करण्याचे साधन आहे. मात्र, कायद्याने अस्पृश्यता नष्ट झाली तरी, अनेक गावांमध्ये ती बघावयास मिळते. मानसिकता संपलेली नाही. हा कुण्या एकाचा नव्हे, तर सामुदायिक पराभव आहे. वाजपेयी-आडवाणींच्या सरकारला आरएसएसचे सहकार्य होते. आताचे सरकार आरएसएस थेट चालवित आहेत. सुरक्षा पातळीवरची लढाई प्रत्यक्ष क्रांतीतून आणण्याची गरज आहे.ङ्क
डॉ. साळुंखे हे सत्यशोधक महापंडित आहेत, देशाच्या धार्मिक इतिहासाचे ते मोठे संशोधक आहेत, असे विचारवंत डॉ. हरी नरके म्हणाले. माजी आमदार उल्हास पवार यांनी जातीअंताची लढाईच जातीवंत झाल्याची खंत व्यक्त केली. जातीअंताच्या नावाने महापुरुषांना जातीत अडकवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. एकनाथ साळवे यांनी बहुजन समाज अज्ञान व आंधळेपणामुळे मागे राहिल्याचे सांगत ङ्कजातींमधील विकृती तोडाङ्क, असे आवाहन केले. स्वागतपर भाषणात डॉ. बबनराव तायवाडे यांनी फुले, शाहू, आंबेडकरांनंतर साळुंखे यांचे नाव घेतले तर वागवे ठरणार नाही, असे उद्गार काढले. समाजसेवी गिरीश गांधी यांनी महाराष्ट्रातील संस्कृतीचा बाप माणूस असा उल्लेख केला.सत्यपाल महाराज,डॉ. सुनील तलवारे, मधुकर मेहकरे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. अशोक चोपडे यांनी केले. संचालन वंदना वनकर, प्रदीप शेंडे यांनी केले. मानपत्राचे वाचन संजय शेंडे यांनी केले. आभार अनुज हुलके यांनी मानले.

मॅराथॉन सोहळा, शांत प्रेक्षक
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात तब्बल साडेचार तास हा सोहळा चालला. तासभराचा माहितीपट आणि त्यानंतर विचारपीठावरील एकाहून एक सरस विचारवंत मंडळी… यामुळे विचारधनाची मोठी लूट होण्याची शक्यता सर्वांनाच होती. म्हणूनच की काय ११.३२ वाजता सुरू झालेला हा सोहळा मॅराथॉन चालला. एरवी तासभर शांत न बसणारे प्रेक्षक या सोहळ्यात मात्र शांतपणे बसून हेते.