विमुक्त भटक्या जमातीतील 10 मुला – मुलींना शाळेत प्रवेश

0
17
बिलोली (सय्यद रियाज) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत बार्टी पुणे तर्फे कार्य करणारे शेख ईर्शाद मौलाना यांनी विमूक्त भटक्या जमातीच्या शिक्षणापासुन वंचित असलेल्या  एकुण १० मुलांना पहील्याच दिवशी  शाळा प्रवेश करुन दिले
बिलोली जवळील विजयनगर  तोलनाका परिसरात वास्तव्य करणारा वैदु समाज अतिशय गरीब परिस्थिती व डब्बे व चाळण्या तयार करुन उदरनिर्वाह करणारा हा घटक आहे यांची बहुतेक मुले ही शिक्षणापासुन वंचित आहेत . गेल्या ०३
 वर्षापासून वास्तव करत आहे ही बाब समतादुत शेख ईर्शाद मौलाना यांच्या लक्षात आली त्या अनुषंगाने गेल्या ०१ वर्षापासून सतत ह्या लोकांची भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व शाळेच्या पहिल्याच दिवशी एकुण १० मुलांना शाळा प्रवेश केले .
सदर मुलांना शाळा प्रवेश करण्यासाठी नगर परिषद प्रा.शाळा बिलोली येथे कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले बार्टीच्या सहाय्यक प्रकल्प संचालिका सुजाता पोहरे , प्रमुख पाहुणे  म्हणून माजी नगर अध्यक्ष  संतोष कुलकर्णी व मार्गदर्शक म्हणून न.पा.चे उपाध्यक्ष मारोती पटाईत तसेच  न.प.चे नगरसेवक शाहेद बेग , जावेद कुरेशी , अमजद चाऊस, लक्ष्मण शेट्टीवार  ,वलियोद्दीन फारुखी  , शेख फारुख अहेमद ,शाहेद पटेल , मिर्झा मुज्जु बेग याची उपस्थिती होती
 कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना मौलाना मिर्झा अहेमद बेग यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे  शैक्षणिक धोरण व आजच्या २१ व्या शतकात शिक्षण ही काळाची गरज ह्या विषयावर  सखोल मार्गदर्शन  केले .तसेच न प.चे उपाध्यक्ष मारोती पटाईत यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की ,अभिनंदन व स्वागत खरं म्हणजे ह्या १०  मुलांना करावे की जेणेकरुन त्यांच्या मध्ये उत्साह निर्माण होईल व उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षकांची भूमिका ह्या विषयावर मार्गदर्शन केले व कार्यक्रम चे अध्यक्ष सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की , आज महाराष्ट्रात बार्टी तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग हा नाविन्यपुर्ण उपक्रम आहे व विविध योजनांची माहीती जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत .ह्याच पद्धतीने गेल्या ०७ नोव्हेंबर २०१७ रोजी लोहगाव जिल्हा परीषद शाळेत आमच्या बिलोली चे समतादुत यांच्या पुढाकाराने चितोडीया समाजातील एकुण १० मुलांना शाळा प्रवेश करण्यात आले तसेच सदरचे उपक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक कैलास खणसे व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे व नांदेड समाज कल्याण आयुक्त  बी. एन .वीर यांचे मार्गदर्शन होत असते . प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम  यशस्वीतेसाठी शाळेचे सहशिक्षक अजिजा बेगम , नजमा बानो व माहेगावे , जाधव ,पदमावार यांनी परीश्रम घेतले व कार्यक्रम चे सूत्रसंचलन शेख इर्शाद यांनी केले व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका एल.व्हि.तोटोड यांनी मानले.