फलोत्पादन च्या ऑनलाईन अर्जासाठी 10 दिवसाची मुदतवाढ

0
11
भागवत देवसरकर यांच्या मागणीला यश.
नांदेड.(प्रतिनिधी),दि.21.ः-एकात्मिक फलोत्पादन अभियानातील NHM घटकासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी काल निवेदनाद्वारे संचालक NHM पुणे यांचे कडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी केली होती.याच मागणीची दखल घेऊन कृषी विभागाच्या कडून १० दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे.MIDH मध्ये सन 2018-19 या आर्थिक वर्षात NHM च्या घटकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख  20 जून 2018 ठेवण्यात आली होती,सदर योजनेस शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत 1लाख 25 हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते,असे असले तरी अजूनही राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज करण्याचे बाकी असल्याने व गेली दोन दिवस सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज दखल करण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्याबाबत मागणी करण्यात आली होती,या सर्व बाबींचा विचार करून अर्ज दाखल करण्याची मुदत 10 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे, आता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 जून2018 करण्यात येत आहे.तसेच राज्यातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय सोडत एकाच दिवशी दिनांक 10 जुलै2018 रोजी होईल अशी माहिती कृषी संचालक पुणे यांनी दिल्याचे भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.