कोतवालास २०० रुपये लाच घेतांना रंगे हाथ अटक

0
9

 गोंदिया,दि.21ः : तक्रारदाराच्या व त्यांच्या भावाच्या नावे मौजा नवेगाव येथे असलेल्या शेतजमिनीचे ७/१२ उतारे घेण्याकरीता तलाठी कार्यालयात गेले असता या दरम्यान तलाठी हजर नसल्यावेळी कोतवाल शेंडे यांनी तक्रारदार व भाऊच्या नावाचे शेतीजमीन ७/१२ उताऱ्याची मागणी केली. त्यावेळी कोतवाल शेंडे यांनी तक्रारदारास म्हटले की मी तुमच्या शेताचे ७/१२ उतारे तलाठी साहेबांकडून तयार करून देतो असे बोलून २०० रुपयाची मागणी केली असून सदर रकम स्वीकारल्यावरून कोतवाल शेंडे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन तिरोडा येथे कलम ७,१३ (१) (ड), सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात पुढील तपास सुरू असून सदरची कारवाई पी.आर.पाटील पोलिस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत कोकाटे पोलिस उपअधिक्षक, दिलीप वाढणकर पोलिस निरीक्षक, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, ना.पो.शी.रंजित बिसेन, डिंगवर जाधव, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन व चालक देवानंद मारवते यांनी केली आहे.