जि.प.च्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0
4

गडचिरोली,दि.22- एका निवृत्त महिला कर्मचाºयांची पेंशन केस मंजूर करण्यासाठी तिच्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना (दि.२१) गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. रवींद्र नीळकंठ देवतळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.लाच-लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ती ही समाजकल्याण विभागात कर्मचारी होती. निवृत्त झाल्यानंतर तिने पेंशन केस मंजूर करण्यासाठी आपल्या विभागाकडे अर्ज केला. परंतु केस मंजूर करण्याकरिता सहायक लेखाधिकारी रवींद्र देवतळे याने तिला ५ हजार रुपयांची मागणी केली.  तडजोडीअंती तो ४ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्तीची मुळीच इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाºयांनी आज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात सापळा रचला. यावेळी एसीबीच्या अधिकाºयांनी सहायक लेखाधिकारी रवींद्र देवतळे यास तक्रारकर्तीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३(१)(ड), सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.

सदर कारवाई लाच-लुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.