सिख वेलफेयर असोसिएशन तर्फे दहावी व बारावीच्या गुणवंतांचा सत्काराचे आयोजन 

0
6

नांदेड,दि.२२ (प्रतिनिधी) – येथील शीख समाजाच्या वरिष्ठ नागरिकांची सेवाभावी सामाजिक संस्था असलेल्या “सिख वेलफेयर अस्सोसिएशन, नांदेड” तर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या शीख समाजातील विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून येत्या तारीख १ जुलै , २०१८ रोजी संत मंडळी आणि प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्काराचे कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भगवंतसिंघ गुलाटी आणि सचिव लड्डू सिंघ महाजन यांनी दिली.

वरील कार्यक्रम श्री गुरु अंगद देवजी यात्री निवास येथे सकाळी ११ वाजता होणार असून आशीर्वाद देण्यासाठी गुरुद्वारा तखत सचखंड हजार साहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंत सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेबचे मुखी संतबाबा बलविंदर सिंघजी कारसेवावाले उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फास्के, सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ. राजेंद्र मुंदडा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे.

ज्यांना परीक्षेत ६० टक्क्याहून जास्त गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकाची झेरॉक्स कॉपी नंदीग्राम सोसायटी उडाणपूल रोड येथील सिख वेलफेयर असोसिएशनच्या कार्यालयात आणून देणे. किंवा प्राचार्य गुरुबचनसिंघ सिलेदार, पत्रकार रविंदर सिंघ मोदी यांच्याकडे ता. २८ जून , २०१८ पर्यंत सादर करावी. वरील कार्यक्रमात विद्यार्थीं आणि पालकांनी उपस्थित राहावेत अशी विनंती करण्यात आली आहे.