आज पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची आढावा, कार्यकारणी निवडीची बैठक

0
6
नांदेड(प्रतिनिधी)दि.23 _पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची महत्वाची आढावा बैठक व जिल्हा कार्यकारणी निवडीची बैठक रविवार दी 23 जून रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित केली आहे. बैठकीत जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीच्या नविन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात येणार आहेत.
कृषी परिषदेमध्ये काम करणाऱ्यां इच्छुकानी तसेच सर्व विभागिय पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,तालुकाअध्यक्ष यांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर, प्रा.विवेक सुकने,संदीप पावडे,जिल्हाध्यक्ष विनीत पाटील,परमेश्वर काळे, प्रशांत पाटील आबादर,रामदास मालेगाव,गंगाधर पवार यांनी केले आहे.