पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत आबादार,रामदास माळेगावे

0
15
नांदेड(प्रतिनिधी)दि.24ः-पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत पाटील आबादार,दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी रामदास माळेगावे यांची निवड  शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित बैठकीत  करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सल्लागार शंकर पवार,तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर,किशनराव वानखेडे,गजानन कदम, एकनाथ मोरे,संदीप पावडे,NSUI जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे,संभाजी ब्रिगेड चे संघटक भगवान कदम आदी उपस्थित होते.
 यावेळी बैठकीत जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीच्या नविन पदाधिकारीपदी जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर पवार,सचिव मोतीराम पवार, तालुकाध्यक्ष बिलोली नामदेव पाटील नरवाडे, मुखेड,बालाजी पाटील लखमापुरकर,अर्धापूर मंगेश गवळी,हदगाव शेख रहीम,आदींच्या निवडी करण्यात आल्या.कृषी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच्या विधायक कामासाठी निश्चीत प्रयत्न करणार असल्याचे भागवत देवसरकर यावेळी सांगितले. उपस्थितीना गजानन कदम,किशनराव वानखेडे,संदीप पावडे, आदीनी मार्गदर्शन केले.
यावेळी बैठक ला महानगर अध्यक्ष परमेश्वर काळे,सुनील पाटिल,संदीप वानखेडे,अविनाश कदम,गजानन नागेलीकर,शुभम शिंदे,प्रशांत टेकाळे,संदेश माळेगांकर,राजू पाटील आबादार,भगवान आबादार,यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.