विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास जि. प. शाळेतच शक्य- उपशिक्षणाधिकारी

0
15

गोंदिया,दि.27ः-विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याची किमया गाव पातळीवर शिक्षकच करू शकतात. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने त्याचे सवार्ंगीण विकास करून त्यामध्ये आमुलाग्र बदल घडविण्याचे कार्य शिक्षक करीम असतात. म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना जि. प. शाळेतच शिकवावे असे प्रतिपादन गोंदिया जि. प. चे नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी कुणाल कनक यांनी केले.
ते पं. स. गोंदियाअंतर्गत ग्राम कारंजा येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत नवगतांचे स्वागत व पुस्तक वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. चे सरपंच धनवंता उपराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य योगराज उपराडे, उपसरपंच महेंद्र शहारे, तमुस अध्यक्ष विजय बनोटे, माजी उपसरपंच मिताराम हरडे, झनकलाल प्रधान, मुख्याध्यापिका छाया कोसरकर प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण गावात प्रभात फेरी काढल्यानंतर सर्व प्रथम रार्जशी छत्रपति शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मान्यवरांनी पुष्पांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या कार्यक्रमासंदर्भात मुख्याध्यापिका यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी पं. स. सदस्य योगराज उपराडे, मिताराम हरडे, धनवंता उपराडे व एल. यू. खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांनी आपल्या परिचय दिला.
याप्रसंगी पहिल्या वर्गात भरती झालेल्या ४५ चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आली व शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन एम.टी. जैतवार यांनी केले तर आभार के. जे. बिसेन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. डी. पारधी, एल. यु. खोब्रागडे, नरेश बडवाईक, डी. आय. खोब्रागडे, जी. बी. सोनवाने, वर्षा कोसरकर, संगीता निनावे, एम. एम. चौरे, पूजा चौरसिया तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सहकार्य केले.