वैद्यकीय प्रवेशात ओबीसींवरील अन्याय दूर करा

0
9

गडचिरोली,दि.30ःवैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. शासन निर्णयात सुद्धा ओबीसींना २७ टक्के, एस.सी. १५ टक्के, एस.टी.ला ७.५ टक्के आरक्षण नमूद केले आहे. असे असताना सुद्धा आरक्षणाचे सर्व निकष, सूचन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ओदशाला धुडकावत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्राच्या जागांपैकी ओबीसींना केवळ 74 म्हणजे १.७ टक्के जागा देऊन ओबीसींवर अन्याय केला आहे. त्यामुळे ओबीसींवर झालेला अन्याय दूरा करावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
मागीलव वर्षी सत्र २0१७-१८ मध्ये सुद्धा ओबीसींन वैद्यकीय प्रवेशात फक्त ६८ जागा ठेवण्यात आल्या होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या विरोधात केंद्रीय आरोग्य मंत्री व गृहराज्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ओबीसींवर झालेला अन्याय लक्षात आणून दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि यावर्षी पुन्हा तोच प्रकार घडला. केंद्र शासनाने व राज्य शासनकडे याकडे तातडीने लक्ष न दिल्यास संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूवित वांढरे, िपंकज खोबे, निशिकांत नैताम, सुधांशू बुजाडे, देविदास सोरते, शुभम बांगरे, सुरज डोईजड, बादल गडपायले, कुणाल लमाटे, राहूल भांडेकर, तुषार वैरागडे, हर्षद वैरागडे, शुभम चापले, करणे ढोरे, हर्षद भांडेकर, प्रमोद कुनघाडकर, आकाश सोनटक्के, किरण कटरे, प्रशांत कुनघाडकर, क्रिष्णा वडस्कर, रमेश कोठारे उपस्थित होते