अनुसूचित जाती शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे अचूक प्रस्ताव महाविद्यालयांनी तातडीने सादर करण्याचे आवाहन

0
31

वाशिम, दि. ३० : जिल्ह्यात सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे नुतनीकरणाचे २८१७ शिष्यवृत्तीचे तसेच ७९ फ्रिशिपचे अर्ज नोंदणीकृत झालेले आहेत. अपेक्षित नोंदणीकृत अर्ज ४००० असतांना त्या अनुषंगाने समाज कल्याण कार्यालयाला प्राप्त झालेल्या अर्जाचे प्रमाण कमी आहे. तसेच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे फ्रेश १२३१ शिष्यवृत्तीचे तसेच ६४ फ्रिशिपचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. अपेक्षित फ्रेश अर्ज २५०० असून महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्जांची संख्या अधिकअसल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच प्राप्त झालेले फ्रेश अर्जांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तरी सर्व संबंधित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेले नूतनीकरणाचे व फ्रेश अर्ज तातडीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करावेत.

समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झालेल्या फ्रेश अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. काही अर्जांवर अर्जदाराची सही नसणे, अर्जदाराने विहित कागपपत्राची पुर्तता न करणे, बँक खातेसोबत आधारकार्ड लिंक नसणे, महाविद्यालयाचे बी-स्टेटमेंट अपूर्ण असणे, बी-स्टेटमेंटमधील फीस बरोबर नसणे, अर्जासोबत डोमिसाईल प्रमाणपत्र नसणे इत्यादी त्रुटीमुळे अर्ज प्रलंबित आहेत. या संदर्भात समाज कल्याण कार्यालयाने संबंधित महाविद्यालयांना पत्राद्वारे कालवून त्रुटींची पूर्तता करण्यास सांगितले आहे, मात्र महाविद्यालयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे निदर्शनास येत आहे. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी. तसेच त्रुटीविरहीत फ्रेश शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम या कार्यालयाकडे त्वरित सादर करावेत. जेणेकरून शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढणे शक्य होईल. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील,   असे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.