पास्टर सुभाष माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली जिल्हा कारागृहास ग्रंथभेट

0
126

कोल्हापूर (जयसिंगपूर) दि. ३० : जयसिंगपूर येथील कवितासागर साहित्य अकादमीचे मार्गदर्शक आणि न्यू लाईफ फेलोशिपचे प्रमुख पास्टर सुभाष माने यांचा ५०वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर ही साहित्यिक संस्था विविध सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग घेऊन वेगवेगळे समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते.‘वाचाल तर वाचाल’ या संदेशाची प्रेरणा घेऊन कारागृहातील ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पुस्तकांमुळे  कारागृहातील बंदीजनांना नियमितपणे पुस्तके वाचण्यास मिळत असल्यामुळे त्यांच्या मनाचे परिवर्तन होऊन पुढील जीवनात नक्कीच या पुस्तकांचा उपयोग होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ५० वेगवेगळी पुस्तके सांगली जिल्हा कारागृहाच्या ग्रंथालयाला भेटस्वरुपात देण्यात आली.

सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुशील कुंभार यांनी ही ग्रंथभेट स्वीकारली व पास्टर सुभाष माने यांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी डॉ. सुनील दादा पाटील यांनी बंदीजनांच्या मनाचे परिवर्तन होण्यासाठी ग्रंथांची आवश्यकता असल्याचे विचार व्यक्त करून कारागृहात ई-बुक लायब्ररी/ डिजिटल लायब्ररीची संकल्पना मांडली आणि कवितासागर साहित्य अकादमीच्या वतीने लवकरच एक हजार ई-बूकची डिजिटल लायब्ररी सांगली जिल्हा कारागृहात सुरू करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी डॉ. सुनील दादा पाटील यांच्या या अनोख्या संकल्पनेबद्दल गौरवोद् गार काढले व कवितासागर परिवाराचे नेहमीच सहकार्य घेऊ असे अभिवचन दिले.

पास्टर सुभाष माने हे सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी बंदिजनांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे ग्रंथभेट देऊन आपल्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्त एक अभिनव उपक्रम राबविण्यात ते यशस्वी ठरले. अशी चर्चा सर्वत्र होत आहे. वाढदिवसानिमित्त कारागृह सुशील कुंभार यांच्या शुभहस्ते मिठाई व पुष्पगुच्छ देवून पास्टर सुभाष माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.त्या वेळी पास्टर सुभाष माने म्हणाले, “हा अनोखा वाढदिवस साजरा करण्याचे श्रेय कवितासागर साहित्य अकादमीचे सर्वेसर्वा डॉ. सुनील दादा पाटील यांना देवून त्यांच्या अनमोल सहकार्य व सहयोग यामुळेच संपन्न झाला.” यावेळी कारागृहाचे कर्मचारी उपस्थित होते.