खोट्या आश्‍वासनांवर आलेली भाजप सरकार-नाना पटोले

0
8

चंद्रपूर,दि.0१ःःमत घेण्यासाठी भाजपा जनतेला केवळ आश्‍वासन देते. २0१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यात शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बॅंक खात्यात, सन २0१९ पर्यंत सर्वाना घरे यासह अनेक आश्‍वासनांची खैरात वाटली होती. परंतु बहुमतातल्या या सरकारला सत्तेत ४ वर्षे होऊन सुध्दा दिलेली आश्‍वासने पूर्ण करता आली नाही. आता या आश्‍वासनाची उलटी गंगा संपूर्ण देशात वाहत असल्याचा आरोप माजी खा. तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
येथील तालुका व शहर कॉंग्रेस कमेटीच्या वतीने मुरलीपाटील गुंडावार लॉन येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॉंग्रेस नेते मनोहरपाटील ताजणे, इंटकचे नेते धनंजय गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, डॉ. बी. प्रेमचंद, वरोर्‍याचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले, प्रेमदास आस्वले, माजी नगराध्यक्ष सरिता सुर, महिला तालुका कॉंग्रेस अध्यक्ष लिला नवले, नगरसेवक अल्का सातपुते, शेखर रंगारी, परशुराम जांभुळे, हरिश दुर्योधन, विलास खडके, शंकर बोरघरे, वैशिष्ट लभाने, सतीश वानखेडे, चिंतामण आत्राम, भानुदास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सचिव अतुल लोंढे यांनी जनलोकपाल विधेयक लागू करण्यासाठी २0१३ मध्ये समाजसेवी अण्णा हजारे यांनी केंद्रातील कॉंग्रेस शासनाच्या विरोधात दिल्लीत आंदोलन केले होते. आज भाजप सरकार पुर्ण बहूमतात केंद्रात सत्ते असतांना त्यांनी हे विधेयक लागू केले नाही. आता अण्णा हजारे चूप का? ते आरएसएस चे आणि भाजपचे सर्मथक तर नाही ना? असा संशय येत आहे. कॉंग्रेसने सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देऊन प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करण्याचे शस्त्र त्यांच्या हाती दिले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे, शहर कॉंग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दिलीप मांढरे, लक्ष्मण न्याहारे, अमित मोदी, सुरेश मांढरे, पवन हुरकट, रवि पवार, प्रकाश दास, प्रमोद दुधे, सुनील तुम्मे, मंदा जुनघरे, मंदा तराळे, बिलकीस शेख, सुनील पतरंगे, दिलीप नागपुरे, किशारे पिपराडे, जावेद शेख, सागर मोरे, संदिप मंदे, जितेंद्र माहुरे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.