रोपवनाच्या कामात भ्रष्टाचार;अखेर चौकशीचे आदेश

0
20
मोहाडी,(नितीन लिल्हारे),दि.04 : मोहाडी तालुक्यातील कान्द्री वनपरिक्षेत्र आंधळगाव अंतर्गत सहवनक्षेत्रातील टाकला झुडपी जंगल गट क्रमांक २४७ तसेच सालई खुर्द जंगलातील गट क्रमांक ३८२,३८३ असे एकूण 30 हेक्टर रोपवनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मजुरांनी केली होती.सदर कामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पी.जी. कोडपे प्रकाष्ट निस्काशन अधिकारी वन विभाग भंडारा यांनी दिले आहे. रोपवणाच्या कामात वनरक्षक डी ए फटींग, डी.पी. चकोले वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक गंधारे यापैकी दोषी आढळ्यास निलंबाची कार्यवाही होणार असल्याचे सांगितले;
रोपवनांतर्गत सालई खुर्द झुडपी जंगलात १५ हेक्टर व टाकला  झुडपी जंगलात १५ हेक्टर असे एकूण ३० हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवनाचे काम एप्रिल में महिण्यात २०१८ मध्ये कांन्द्री वन विभागा मार्फत करण्यात आले. सदर काम पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र रोपवनाच्या काम करणाऱ्या मजुरांच्या बँक खात्यात अर्धेच पैसे टाकून भ्रष्टाचार केला असल्याचे निदर्शनास आले.
काही मजुरांना मजुरीची रक्कम अद्यापही मिळाली नाही. यासंदर्भात मजुरांनी आरफओ चकोले यांना तक्रार केली मात्र स्वतः जबाबदार असल्याने भूमिका घेता आली नाही. सालई खुर्द जंगलात रोप वनासाठी १५ हेक्टर जागेत १६६६५ खड्डे मजुरांकडून खोद काम करण्यात आले. तसेच टाकला शेतशिवारात १५ हेक्टर जागेत १६६६५ खड्डे मजुरांकडून खोद काम केले. दोन्ही ठिकाणी एकसारखे काम असून एस्टीमेंट मध्ये तफावत का करण्यात आली. सालई खुर्द येथील काम सात लाखाच्या वर आहे तर टाकला येथील नऊ लाखाच्या वर असून हे काम एक सारखे असूनही पैशाची हेरा फिरी  करण्यात आली.
एक दोन मजुरांना सोडले तर सर्व मजुरांनी डिड बाय डिड प्रति खड्डे २०.३३ पैसेच्या दराने खोदकाम केले. परंतु अतिरिक्त मजुरांच्या नावाने खड्डे दाखवून खऱ्या मजुरांना १२-१३ रुपये खड्डे देण्यात आले. मजुरकरांची ३६० रूपये प्रतिदिवस या दराने हजेरीपटानुसार काम केले. मात्र बिटरक्षक डी ए फटींग, डी.पी. चकोले वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक गंधारे यांनी ३० हेक्टर रोपवनाच्या सालई खुर्द व टाकला कामात हुंडा पद्धतीने प्रत्येकी कडून दोन तीन खड्डे जास्तीचे खोदकाम घेऊन केवळ अर्ध्या पैशात मजुरांची फसवणूक केली.   त्यामुळे मजुरांना त्यांच्या श्रमाचा अत्यल्प मोबदला मिळाला. काही मजुरांना ५ ते ६ हजार रुपये कमी देण्यात आले व बोगस मजुरांच्या नावाने पैशा टाकून आर्थिक देवाण घेवाण करण्यात आले.  जवळपास ५ लाखाचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप मंजूर वर्गाकडून होत आहे. हजेरी घेण्यासाठी सर्व सामान्य माणसाला ठेवून आपला स्वार्थ पूर्ण केला.
संकपाल दमाहे व त्यांची पत्नी अंतकला दमाहे दोघे मिळून ३६० खड्डे खोदकाम करण्यात आले एकूण ७३२९ रुपये पैकी फक्त १३०० रुपये बँक खात्यात जमा केले. सरादू लिल्हारे व सुशीला लिल्हारे दोघे पती पत्नी मिळून ४० दिवस काम केले व १६२० खड्डे खोदकाम केले मात्र त्यांना २० हजार रुपये फक्त देण्यात आले उर्वरित रक्कम अधिकाऱ्यांनी आपल्या पोटी करण्यात आले. फिरतलाल ठाकरे यांनी सुद्दा जोडीवर २४४ खड्डे खोदकाम केले मात्र अर्धेच पैसे मिळाले. जगत लिल्हारे, शंकर गराडे, सुरजलाल सव्वालाखे, ईश्वर हिरापूरे,रमेश अठराहे, दुरंगलाल लिल्हारे,असे गावातील १०० मजुरांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. भर उन्हात अधिकारी ऐशीच्या हव्यात मोज मस्ती करत होते त्यावेळेस मजुरांनी हाळ गाळ मोडून तोच घामाचा पाणी पिऊन डिड बाय डिडचे खड्डे खोदकाम केले. भर उन्हात काम करूनही गरीबाच्या पोटावर वन विभागांनी डल्ला मारला. हेच देशाचे दुर्दैव आहे.
प्रति खड्डा २०.३३ पैशाने मिळेल असे आश्वासन देऊन १०० मजुरांचा शोषण करण्यात आले. काही मजुरांना अल्पदरात पैसे मिळाले तर काही मजुरांना मजुरी मिळालीच नाही. रोपवनाची नुकसान भरपाई जबाबदार कर्मचाऱ्यांकडून घेण्यात यावी व मजुरांना उरलेले पैसे तात्काळ देण्यात यावे. या कामात डी.पी. चकोले वनपरिक्षेत्र अधिकारी,
बिटरक्षक डी ए फटींग,वनरक्षक गंधारे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला, असल्याचे आरोप तक्रारकर्त्या मजुरांनी केला. बिटरक्षक डी ए फटींग, यांना तात्काळ हटवून मुख्यालयी देण्यात आले.
सदर कामाची सखोल चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करावे असे निर्देश पी. जी. कोडापे सहायक वन विभाग भंडारा यांनी दिला आहे, दोषी आढळल्यास त्वरीत निलंबीत करण्यात येईल कोणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही असे म्हटले. या रोपवनातील कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून काम करणाऱ्या मजुराची मजुरी तत्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. या संदर्भात उपवनसंरक्षक वनविभाग नागपूर यांना तक्रार करण्यात येणार आहे.