सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांना घेऊन चर्चा

0
12

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.04:- स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांना घेऊन युवक क्रांती संघटनेच्या सदस्यांनी सिरोंचा येथे रुग्णालयाची पाहणीकरीता आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रुडे,आर एम. दुर्वे, ए.ओ. बालाजी पवार यांच्याशी चर्चा करीत समस्या सोडविण्याची मागणी केली.यावेळी युवक क्रांती संघटनेचे सदस्य आकाश परसा, मंगेश जाधाव, विजय बोंगोनी, आकाश गुजवार, साईकिरण घरपट्टी, नागेश येलेला, मोहम्मद शकलीन, हरीश शेनिगरेपू, सुरेश तिपट्टीवर उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षा पासून वैद्यकीय अधीक्षक पद ,नेत्र चिकित्सक व क्ष-किरण तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते.वेळेवर गरीब रुग्णांना शेजारील तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत असल्याने रूग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावे लागत आहे.त्यामुळे या रिक्त जागा त्वरीत भरण्याची मागणी करण्यात आली.  108 रुग्ण वाहिकेसाठी लवकरच डॉक्टर उपलब्ध करून देणार व क्ष किरण तज्ञ अहेरी येथून आठवड्यातून एक दोन दिवसासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्याचे आश्वासन दिले.रुग्णासांठी औषधसाठा उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत चर्चा करत असताना वैद्यकीय अधिकारी प्रशांत दाकडे, डॉ वल्क व संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होते.