सिडकोच्या जमीन वाटपाला घेऊन सरकारला घेरले

0
12

नागपूर,दि.06ः-एकूण २४ एकर सिडकोची १८३ क्र.ची नवी मुंबईतील पालघर येथील अत्यंत मोक्याची जमीन जिल्हाधिकार्‍यांनी १२ जून २0१६ रोजी बिल्डरला विकली. या चोवीस एकरमधील चार एकर जमीन बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर अकादमीने तर पाच एकर जमिनीची मागणी एका अन्य सामाजिक संस्थेने केली होती. मात्र शासनाने हे दोन्ही अर्ज विचारात न घेता संपूर्ण जमीन एका बिल्डरच्या घशात घालून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
ही जमीन सिडको किंवा जिल्हाधिकार्‍याची नसून ही शासनाची जमीन आहे. या बिल्डरने २0१७ साली आठ शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांसमोर उभे केले. या आठही शेतकर्‍यांच्या नावे १५ लाख रुपये घेऊन त्यांच्या नावे आधी जमीन करण्यात आली यानंतर या सर्व शेतकर्‍यांना १८ लाख रुपये देऊन बिल्डरने ती सर्व जमीनीचे विक्रीपत्र स्वत:च्या नावाने करून घेतले. २४ फेब्रुवारी २0१७ रोजी जिल्हाधिकार्‍यांनी सिडकोची ही जमीन बिल्डरला वितरीत केली. एका दिवसात हा सर्व कारभार उरकण्यात आला. ही अत्यंत गंभीर बाब आहे. बिल्डरांची ही टोळी म्हणजे राजकीय दलालांची टोळी असून सर्व विरोधकांनी या व्यवहाराचा पर्दापाश झाला पाहिजे अशी मागणी केली. तीन हजार कोटींची जमीन बिल्डरला कवडीमोल देण्याचा सरकारचा हेतू काय? याची न्यायालयीन चौकशीची मागणी आज सर्व विरोधकांनी सभागृहात धरुन लावली व मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो त्यांनी न्यायालयीन चौकशीची विरोधकांची मागणी आज सभागृहात मान्य केली.