१४२ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पुरस्कार जाहीर

0
13

गडचिरोली,दि.0८ः-महाराष्ट्र राज्यात उल्लेखनिय व विशेष कामगिरी करणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येते. यावर्षी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १४४ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह घोषीत करण्यात आले आहे. त्यापैकी एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील १४२ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये उपविभगीय पोलिस अधिकारी ६, सहाय्यक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक १५, पोलिस हवालदार ६, पोलिस नाईक २४ व पोलिस शिपाई ७0 यांचा समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचरी यांना पोलिस महासंचालक यांचे सन्माननिच्ह प्रथमच प्रप्त झाले ही जिल्हा पोलिस दलासाठी गौरवाची बाब आहे. पुरस्कार प्राप्त पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख यांनी अभिनंदन केले आहे.