भोकर पोलिसांची दिड लाखांचा गुटखा पकडून कार्यवाही

0
10

भोकर,दि.08: भोकर पोलिसांनी मुदखेड मार्गाने भोकर मध्ये आवक होत असलेल्या दिड लाख रुपयांच्या गुटख्यावर धाड टाकून मुद्देमालासह महिंद्रा पिक अप गाडी जप्त करुन कार्यवाही केली आहे.भोकर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार नामदेव कोटु जाधव यांना एकाने मुदखेड मार्गाने भोकर शहरांत लाखोंरुपयांचा गुटखा पाठविल्या जात आहे.त्याबद्दल अधिकृत माहिती पुरवली.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित माहिती अापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन धाड टाकण्यासाठी मदतीचे आवाहन केले.त्या अनुषंगाने सपोनि सुशील चव्हाण हे वाहन चालक उताडे आणि पोकाॅ. शिवाजी पाटील यांच्या सह रिठ्ठा शिवारात वाहन घेऊन दाखल झाले.आणि दुपारी १२ ते १ च्या दरम्यान त्यांनी मुदखेड मार्गाने महिंद्रा पिक अप क्र एम.एच.२२ एच 2737 यामध्ये असलेल्या दिड लाख रूपयांचा गुटख्याचा मुद्देमालासह वाहन चालक गणेश बद्धु आडे रा.दुर्गा नगर तांडा रेल्वे स्टेशन मुदखेड यांस वाहनासह पकडले आहे.याकार्यवाही ची माहिती भोकर पोलिसांकडुन अन्न भेसळ कार्यालय नांदेड यांना पुरविण्यात आली आहे.अधिक तपास भोकर पोलिस करीत आहेत.