छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी

0
17

नागपूर,दि.08- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तब्बल 3 वर्षांनंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या आरोपांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. उभय नेत्यांना आवरण्यासाठी इतर मंत्री व आमदारांना धावून जावे लागले.पुरवणी मागण्यावरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडविल्याचा गंभी आरोप केला. अर्थसंकल्प सादर करून झाल्यावर 3-4 महिन्यातच 11 हजार कोटींच्या पुरवणी मागण्याची गरज का पडली, असा सवाल भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात 50 कोटी झाडे लावणे ही चांगली बाब आहे, पण तुमच्या वनविभागाचे अधिकारी झाडे लावण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे आदिवासींची वन हक्काची प्रकरणे प्रलंबीत आहेत. या भुजबळांच्या आरोपांवरून विधानसभेत ठिणगी पडली.