महादेव जानकर साहेब इतिहास घडवणारे नेते : बाळासाहेब दोडतले

0
23
सांगली(आबासो पुकळे),दि.10 :संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या  महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांची बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रासपा मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना ‘जानकरानी या देशात आज इतिहास घडवला असून महादेव जानकर इतिहास घडवणारे नेते, असल्याची  प्रतिक्रिया दिली.श्री दोडतले, आज सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सांगलीत आले होते. त्यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे,उच्चशिक्षित, कर्तव्यदक्ष उमेदवार राष्ट्रीय समाज पक्ष उतरवणार आहे अशी माहिती श्री दोडतले यांनी दिली. दरम्यान रासप पदाधिकारी कार्यकर्त्यांना रासपाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी पेढे मेवा मिठाई वाटून आनंदोस्तव साजरा केला. यावेळी रासपाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य नितीन धायगुडे, सांगली जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, सांगली शहर जिल्हाध्यक्ष सुरेश टेंगले,  शहराध्यक्ष महेशदादा मासाळ, रासपाचे सांगली शहरातील ज्येष्ठ हितचिंतक अमृत जानकर, कुमारी प्रतीक्षा जानकर आदि उपस्थित होते.