पिकविम्यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदोलन

0
11

नांदेड,दि.11ः-पीकविमा देण्याबाबत शासन आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सरकार आपण शेतकऱ्यांचे हित करत आहोत असे भासवत आहेत. शेतकऱ्यांचा कोरडा पुळका दाखविणाऱ्या सरकारचे डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी ,शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंघ जहागीरदार,रवी राठोड,  शहराध्यक्ष शफिक अब्दुल , मनसे विद्यतरही आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेत्रत्वखाली हे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखविणार असे आश्वासन देत सत्तेत दाखल झालेल्या फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल अशी ग्वाही देणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आत्महत्या करण्याची  वेळ आली  आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ पेक्षा ज्यास्त तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही. काही तालुक्यातील तर एकही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. मोजक्या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून आम्हीच शेतकऱ्यांचे तारणहार आहोत असा आव सरकार आणीत आहे.पीक विमा सरसकट मंजूर करून आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून  मुक्त करावे या मागणीसाठी मनसे पक्ष प्रमुख  राज ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षाचे नेते अभिजित पानसे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे असे निर्देश जिल्हा पदाधिकाऱयांना दिले होते . यानुसार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आज  १० जुलै रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत.

सकाळी करण्यात आलेल्या धरणे आनोदालनात  जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंघ जहागीरदार,रवी राठोड,  शहराध्यक्ष शफिक अब्दुल , मनसे विद्यतरही आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गजानन चव्हाण, केदार नांदेडकर, पप्पू मनसुके,अच्यूत जगताप,शहरउपाध्यक्ष जोगेंद्र केंद्रे, शक्ती परमार,महेश ठाकूर, अनिकेत परदेशी, सुशील कुमार, गणेश पाटील डोणगावकर,सुभाष भंडारे, शंकर सरोदे, प्रसाद कदम,जैनेंद्र कदम,  यांच्यासह सुधील जोंधळे , प्रशांत धागे, अश्विन काळे, माधव पावडे, चंद्रप्रकाश वारे, कैलाश देशमुख, बालाजी शिपार्कर, मारोती कवने, दत्त पा. मोरे, चंद्रकांत पवार, प्रकाश जाधव, अविनाश पवार, शंकर महाजन, संदीप कटारे, गजानन चिंतोळे, साहेबराव कोंढावर, सुरेखा पाटील, उषा नरवाडे, प्रेमाला हणमंते, सीमा सूर्या यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका प्रमुख, शहर अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.