तीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार

0
24

बिलोली,दि.14ः-  तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़
तालुक्यात बिलोली, बिजूर व कुंडलवाडी येथे लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या पहिली ते आठवी अशा तीन शाळा चालतात़ प्रारंभी दोन वर्षे प्रगतीकडे घोडदौड करणाºया शाळेतील शिक्षकांचे व संस्थाचालकांचे बिनसले़ आर्थिक देवाणघेवाण, पगारातून परस्पर कपात आदी वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या़ जिल्हा परिषदेसमोर सामूहिक उपोषणही केले़ मागच्या सहा महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या़ अशा परिस्थितीमुळे अशोक विद्यालय कुंडलवाडी येथील ३०० विद्यार्थ्यांनी एकाच पंधरवड्यात शाळा सोडली़ बिलोलीतील सत्यसाई विद्यालयातही असाच प्रकार झाला़ शिक्षक व संस्थाचालकांचे बिनसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालकही सैरावैरा झाले़ जून-जुलैच्या महिन्यात प्रवेश प्रक्रिया असताना विद्यार्थी शाळा सोडून गेले़ शुक्रवारी एकाही शाळेत शिक्षक आले नाहीत. सर्व वर्गांची मुले एकत्रित करून शाळा सुरू ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली़. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार आल्यानंतर बिलोली गट शिक्षणाधिकाºयांनी विस्तार अधिकारी डी़व्ही़धुळशट्टे यांना पाठवून रितसर चौकशी केली़ शाळेवर शिक्षकच नसल्याने विद्यार्थी कार्यालयासमोर एकत्रित जमा झालेले त्यांना दिसले.