सकारची मानसिकता विकास काम करण्याची नाही

0
14
बिलोली,(सय्यद रियाज),दि.16ः- नांदेड जिल्ह्याचे  जिल्हाध्यक्ष फेरोज खान लाला यांची निवड झाल्यानंतर त्यानी जिल्हा एमआयएमची ताकद वाढवण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष खान हे बिलोली येथे आले असता शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता व पदाधिका-याची बैठक घेण्यात आली. फेरोज लाला असे म्हणाले. की या देशातील सरकार दोन  समाजा मध्ये तेढ निर्माण करुन जनतेला भयभीत करण्याचे काम करत आहे.बीजेपी सरकारची मानसीकता विकास करण्यासारखी नाही.विद्यार्थ्यांच्या समस्यावर आणि बेरोजगारीवर बोलले जात नाही . देशात महिलांवर आत्याचार होत आहेत,त्यावर बोलले जात नाही .येणा-या उद्याच्या काळात पक्षाला मजबुत करण्यासाठी जिल्ह्यात 16 तालूक्यात लक्ष देऊन नांदेडमध्ये एक क्रमांकावर पक्षाला आणणार असल्याचे सांगितले. बैठकीचे आयोजन एम.आय.एम चे तालूका अध्यक्ष साजिद कुरेशी केले