जि.प.च्या माध्य.शाळांना घरघर

0
21

गोंदिया,दि.16ः-जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होत आहे. अशात विद्यार्थ्यांअभावी अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर अनेक शाळा बंद झाल्या आहेत. असे असतानादेखील गोंदिया जिल्ह्य़ामध्ये माध्यमिक शाळांची संख्या अगदी तुटपुंजी आहे. विविध समस्यांमुळे शाळांना घरघर लागली आहे. त्यामुळे जि.प.च्या माध्यमिक शाळांना घरघर लागली. यामुळे याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्यासाठी शिक्षण सभापती रमेश अंबुले यांना महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांची नुकतीच सभा घेण्यात आली आहे. या सभेत जिल्ह्यातील शाळांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. माध्यमिक शाळांना दोन वर्षापासून अनुदान नाही, साहित्य खरेदी अनुदान नाही, विद्यषुत बील भरण्या वाचून काही शाळांची वीज कपात होण्याची वेळ आली आहे. शाळेला इंधन खर्च वेळेवर भेटत नाही. संगणक शिक्षक नाहीत, घड्याळी तासिका कर्मचार्‍यांचे बिल थकीत आहेत, सर्व मुख्याध्यापकांनी सर्व समस्या शिक्षण सभापती रमेश अंबुले यांच्या निदर्शनास आणून दिल्यात व सदर समस्यांची दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी केली.
यावेळी सभापतींनी लवकरच समस्यांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे, आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी खान, फुलबांधे, वाहने, रहांगडाले, एच.बी.बनोटे, मनोज दिक्षीत, गटशिक्षणाधिकारी, मनसे शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष एल.सी.आंधळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.