पिक विम्याची मुद्दत वाढवुन द्या- मनसे

0
19
बिलोली ( सय्यद रियाज),दि.16ः- यंदा पेरणी पुर्व पावसाने जरी चांगली साथ  दिली असली तरी शाषनाकडुन माञ शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे शाषनाच्या सर्व प्रणाली,सुविधा ह्या आॅनलाईन आहेत. त्यातच एक म्हणजे  शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई म्हणजे विमा ही विमा भरण्याची प्रणाली पण आॅनलाईन आहे. परंतू  वारंवार ईंटरनेट सुविधा विस्कळीत होत असल्यामुळे पिक विमा आॅनलाईन पद्धतीने भरण्यास व ७/१२ उतारा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास अडथळा निर्माण होऊन  उशीर होत असल्यामुळे शासनाने दिलेल्या मुद्दतीपेक्षा १५ दिवस मुदत वाढवून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
      ७/१२ उतारा वर तलाठी यांची सही व शिक्का असणे बंधनकारक असताना काही सेतूसुविधा धारक त्यांच्या सेतूसुविधेचा सही व शिक्का वापरुन पिक विमा आॅनलाईन पध्दतीने भरत आहेत. पण विमा कंपनीनुसार अशाप्रकारे विमा भरल्यास  विमा मंजूर होणार नाही.आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रशासन जबाबदार राहील.म्हणून ज्या शेतकऱ्यानी अशा प्रकारे विमा भरला असेल अशा शेतकऱ्यांचे विमा मंजूर करण्यासाठी विमा कंपनीला बंधनकारक करण्यात यावे.व जेणेकरुन विमा भरत असताना शेतकऱ्यांच्या  मनातील संभ्रम दूर होईल असाही उल्लेख करण्यात आला आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांची  गैरसोय थांबवावी, अन्यथा  शेतकऱ्यांच्या हितासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना  रस्त्यावर उतरेल व मनसे.स्टाइल आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिलोलीच्या वतीने तहसिलदार देण्यात आले. त्यावेळी तालुकाअध्यक्ष शंकर महाजन , मनविसे ता.अध्यक्ष गजानन चिंतले,सचिव शिवा शिवशेट्टे, शहर अध्यक्ष संदीप कटारे, मूजाहीद शेख,बळवंत चौधरी,बंडू वानोळे, कृष्ना जाधव, इतर मनसे सैनिक उपस्थीत होते.