येथे दरदिवशी होते रुग्णांच्या नातेवाईकांना ‘भोजनदान‘

0
20
गोंदिया,दि.16ः- स्थानिक बाई गंगाबाई रुग्णालय हे नाव एकताच अनेकाच्या भुवया उंचावतात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने हे रुग्णालय प्रकाशझोतात येत असते. विशेषत: काही दिवसांपूर्वीच रुग्णांच्या कक्षांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या रुग्णालयाचा रुप पुढे आला. अशात या गंगाबाई रुग्णालयातच कुणीतरी चांगले कार्य करीत असल्याचेही सत्य पुढे आले असून टेंशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना येथे भरपेट जेवण देवून लायंस क्लब राईस सिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्यात येत आहे. दररोज अडीचशे ते तिनशे रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान देवून क्लबच्या सदस्यांकडून स्तुत्य असाच उपक्रम राबविला जात आहे.
रुग्णालय म्हणता जिवंतपणातच मृत्यूचे दार अशी सर्वसामान्यांची समज आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात भर्ती केले की रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांचीही चांगलीच फजिती होताना नेहमीच दिसून येते. अनेकदा रुग्णाला उपचारासाठी भर्ती केले जात असताना काहींजवळ पैशांची चणचण असते त्यामुळे अनेकजण उपाशी राहून दिवस काढताना दिसून येतात.  अशा वेळी या रुग्णांच्या नातेवाईकांना साथ देता यावी त्यांना आर्थिक नाही तर कोणत्यातरी साधनाने मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासता यावी या उद्दात हेतूने क्लबचे सर्वच सदस्य तन-मन-धनाने कामाला लागले आहेत.  यामुळे मागील १ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात आतापर्यंत येथे भर्ती असलेल्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांना भोजनदान देण्यात आले आहे.
जुन्या काळात कोर्ट कचेरी व दवाखाना हा कुणाच्याही पदरी पडू नये असे म्हटले जायचे मात्र कधी प्रसूती तर कधी शस्त्रक्रिया तर कधी कोणत्याना कोणत्या आजाराने रुग्णाला व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात यावेच लागते. विशेषत: रुग्णालयात येणे म्हणजे अचानकच उद्भवलेली वेळ अशीच म्हता येईल. त्यामूळे अनेक जण उसणवारी करूनच रुग्णालय गाठतात, अशात त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धीर देता यावा हा यामागचा उद्देश असल्याचे येथील सदस्य सांगतात. १ जुलै पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून आजघडीला १५ दिवसाचा काळ लोटला. यात दरदिवशी सुमारे अडिचशे ते तिनशे रुग्णांचे नातेवाईकांना या उपक्रमातर्गत भोजनदान करण्यात येत असून असे सुमारे चार हजार नातेवाईकांना याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे लायंस क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमात क्लबचे सर्व सदस्य सहकार्य करीत असून अध्यक्ष अजय जायस्वाल, सचिव डॉ. गौरव बग्गा, कोषाध्यक्ष अतुल जायस्वाल, या प्रकल्पाचे संचालक प्रेम नारायण मुंदडा व राजेंद्रqसग बग्गा, रामअवतार अग्रवाल,  भरत क्षत्रिय,  पुष्पक जसानी, अनिल वाधवा,  राजू बिसेन,  पियुष अग्रवाल,  सतीश रैकवार,  संदीप कडूकर, कुणाल सोनी, राम भारद्वाज,  सुशील सिंघानिया, प्रदिप जायसवाल,  सतीश वडेरा, प्रकाश पटेल, सुरेन्द्र पारधी आदी सदस्य सहकार्य करीत आहेत.
दरदिवशी ठरते मेनू ……
रुग्णांच्या नातेवाईकांना नेमके उद्या कशाचे जेवण द्यायचे आहे याचे नियोजन एक दिवसा पूर्वीच करण्यात येत असून स्वंयपाकीला याचे दरदिवशी मेनू ठरवून दिले जाते. ज्यामध्ये दरारोज सायंकाळच्या सुमारास वरण, भात, भाजी असे साधे जेवण देवून रुग्णांच्या नातेवाईकांची भूक शांत केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाची प्रशंसा करून उत्तम जेवण असल्याचे सांगितले.
सर्वसमान्यासाठी काहीतरी नवीन करण्याची ईच्छा….
जून महिण्यात क्लबच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. यावेळी पदाची शपथ घेताना सर्वसामान्यांसाठी काही नवीन करण्याची ईच्छा बाळगून बाई गंगाबाई रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात केली. विशेष म्हणजे क्लबच्या सर्व सदस्यांनीही यात मोलाचे योगदान दिले असून हे उपक्रम वर्षभर प्रत्येक दिवशी राबविण्यात येणार आहे. यात आम्ही शहरवासियांना सुध्दा वाढदिवस, पुण्यतिथी, जयंती आदी सण वारांच्या दिनानिमीत्ताने भोजनदान करून या समाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याचे क्लबचे अध्यक्ष अजय जायस्वाल यांनी सांगितले.