राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अधिवेशन ऐतिहासीक

0
15

गोंदिया,दि.१७: पवार, पोवार, भोयर पवार, परमार समाजाची शीर्ष सामाजिक संस्था राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे गोंदिया येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पवार महासभेसाठी ऐतिहासीक ठरले. १४ जुलै रोजी समाजाचे आदर्श चक्रवर्ती राजाभोज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करुन राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम. शरणागत, उद्घाटक म्हणून आमदार विजय रहांगडाले तर मुख्य अतिथी म्हणून मध्यप्रदेशचे कृषी कल्याण मंत्री गौरीशंकर बिसेन, प्रमुख अतिथी म्हणून बालाघाट सिवनीचे खासदार बोधqसग भगत, विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, इंजि.टी.डी. बिसेन, कंटगीचे आमदार के.डी. देशमुख, माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे, शिशुपाल पटले, माजी आमदार खोमेश्वरभाऊ रहांगडाले, हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा पंचायत बालाघाटच्या अध्यक्षा रेखा बिसेन, समाजसेवी पुष्पा बिसेन, माजी जि.प. सभापती पी.जी.कटरे, माजी पं.स.सभापती डॉ. झामqसग बघेले, शंकर पवार, भारती पारधी व पवार सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी महासभेचे उपाध्यक्ष एम.आर. देशमुख, माजी महासचिव राजेश राणे, प्रा.एच.एच.पारधी, महासचिव मुरलीधर टेंभरे, अधिवेशन आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलाश हरिणखेडे, कार्याध्यक्ष राजेश चव्हाण, कार्यकारिणी सदस्य मौसम हरिणखेडे उपस्थित होते.
महासभेचे राष्ट्रीय अधयक्ष डी.बी. शरणागत यांनी त्यांच्या कार्यकारिणी मार्फत मागील ५ वर्षात करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली. मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्र पर्यंत मर्यादित महासभेचा विस्तार हरियाणा, दिल्ली, पंजाब व उत्तरप्रदेश या राज्यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.पोवार सांस्कृतीक भवन येथे विविध विषयावर सामाजिक गोष्टीचे आयोजन करण्यात आले. समाजातील कुरिती, हुंडा, सामूहिक विवाह, वर-वधू परिचय संमेलन, राजाभोज यांच्या प्रतिमेची स्थापना इ.विषयावर आमदार मधू भगत यांच्या उपस्थितीत विचार विमर्श व चिंतन-मंथन करण्यात आले.या अधिवेशनाच्या आयोजनासाठी पवार प्रगतीशील मंच व पवार प्रगतीशील शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच अधिवेशन आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.या अधिवेशनात देशाच्या विविध राज्यातील समाजबंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.