लाचखोर कनिष्ठ लिपीक व शिपाई एसीबीच्या जाळ्यात

0
7

भंडारा,दि.19: प्रकल्पग्रस्ताला शासनाकडुन मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यापैकी ४० हजार रूपयाची लाच मागणाºया भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, गोसेखुर्द विशेष पॅकेज क्र.३ येथील कनिष्ठ लिपीक व शिपाई यांना भंडारा एसीबीच्या अधिकाºयांनी रंगेहात अटक केली.चंद्रेश काटेखाये ३० वर्ष कनिष्ठ लिपीक व योगेश्वर भोंगाडे वय २८ वर्ष शिपाई असे लाचखोर अधिकाºयांचे नाव आहे.
तक्रारदार यांचे सुरेवाडा (जुना) गोसेखुर्द धरणामध्ये संपादीत झाले असुन त्याकरीता त्यांना शासनाकडुन वाढीव कुटूंबाचे अनुदान म्हणुन २ लाख ९० हजार रूपये अनुदान मंजुर करण्यात आले. त्याकरीता लागणारे संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय गोसीखुर्द विशेष पॅकेज क्र.३ येथे तक्रारदाराने सादर केले.त्याुनसार तक्रारदाराच्या बँक आॅफ बडोदा शाखा भंडारा येथील खात्यावर ते अनुदान जमा झाले. दरम्यान भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, गोसेखुर्द विशेष पॅकेज क्र.३ येथील कनिष्ठ लिपीक चंद्रेश काटेखाये यांनी तक्रारदाराला त्यांना शासनाकडुन मिळालेल्या अनुदानाचा मोबदला म्हणुन ४० हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम न दिल्यास बँकेला व तलाठयाला पत्र पाठवुन तक्रारदाराचे बॅक खाते बंद करण्याची धमकी दिली.
तक्रारदाराने सदर प्रकरणाची भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या सापळा पडताळणीमध्ये चंद्रेश काटेखाये यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार आज दि.१८ जुलै २०१८ रोजी कनिष्ठ लिपीक चंद्रेश काटेखाये यांनी त्यांच्याच कार्यालयात कंत्राटी शिपाई असलेल्या योगेश्वर दसारामजी भोंगाडे वय २८ वर्षे या खाजगी ईसमा मार्फत तक्रारदाराकडुन ४० हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहात अटक केली.
दोन्ही आरोपींनी त्यांच्या पदाचा वाग व भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने दोघांविरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे कलम ७.१२.१३ (१)(ड) सहकलम १३ (२) ला.प्र.कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास एसीबी चे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले करीत आहेत.
सदर कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त/ पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर ,पोनि.योगेश्वर पारधी, पोनि.प्रतापराव भोसले, सफौ. गणेश पडवार, पोहवा. संजय कुरंजेकर, नितीन शिवनकर, पोना.गौतम राऊत, रव्रिंद गभने,सचिन हलमारे, पोशि.शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी,पराग राऊत, कोमलचंद बनकर,चानापोशि दिनेश धार्मीक यांनी केली.