शिक्षण संचालक म्हमाणेनी जाणल्या जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या

0
14

गोंदिया,दि.19ः- नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरात आलेले राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी नागपूरातील स्व.प्रकाश उमाटे हायस्कुलच्या सभागृहात आयोजित मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत गोंदिया जिल्ह्यातील शैक्षणिक समस्यां जाणून घेत,ते सोडविण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन मुख्याध्यापक संघाला दिले.

शाळाव्यवस्थापन करतांना मुख्याध्यापकांना येणार्या समस्या निरसनासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. सभेला  गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाते कार्यवाह मुख्याध्यापक खुशाल कटरे,श्रीमती रजिया बेग,सुनिल पाऊल झगडे,एम.के.बिसेन,जे.बी.कटरे,आर.टी.नाकाडे,एच.एन.राजगीरे,घनश्याम गहाणे,दत्तात्रय संग्रामे यांनी उपस्थित राहून समस्या मांडल्या.त्यामध्ये शिक्षक संच मान्यता दुरूस्तीकरीता पुणे येथे आॅगस्ट महिन्यात शिबिर घेण्यात यावे,जेणेकरुन ज्या माध्यमिक शाळेच्या शिक्षक संच मान्यताना मंजुरी आहे,ती कायम करता येईल.  2013-2014 पासून च्या संच मान्यतासह प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प.गोंदिया येथे सादर करून प्रत्यक्ष त्रुटी त्यांच्या लक्षात आणून द्यावी. कार्यालयीन प्रत शाळा दप्तरी सुरक्षित ठेवावी. रिक्त पदे पवित्र पोर्टल मार्फत भरावी. अतिरिक्त  शिक्षकाचा  प्रश्न सोडवून अतिरिक्त शिक्षकांना शाळांनी रुजू करावे.काही अनुदानित माध्यमिक शाळा non plan मध्ये आहेत. त्यामुळे त्यांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अशा शाळा लवकरच plan मध्ये समाविष्ट करण्यात यावे.पुस्तक पेढी मार्फत ई.1 ते8 वी च्या पुस्तक विद्यार्थ्यांना वितरणा करीता प्राप्त होतात.अशी सोय ई.9ते 10 वी च्या विद्यार्थी साठी ऊपलब्ध करून देण्यात यावी. प्रत्येक मुख्याध्यापक यांना बोर्डाचे काम करणे अनिवार्य असले तरी केंद्र संचालक किंवा उत्तरपत्रीका तपासणी,नियामकच्या कार्यापैकी कोणतेही एक कार्य करण्याची मुभा देण्यात यावी.7 व्या वेतन आयोगात मुख्याध्यापकाची वेतन श्रेणी ,6व्या वेतन आयोगा तील त्रुटी दुरूस्ती सह स्विकारण्याचा प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. या सर्व समस्यां त्वरीत निकाली काढण्याचे आश्वासन म्हमाणे यांनी दिले.