पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंब शेतीची लागवड

0
89
 ◆बपेरा येथील बंधाटे युवा शेतकऱ्यांनी रोजगारावर केली मात
(नितीन लिल्हारे)
सालई खुर्द दि.20 : भंडारा जिल्हा धान उत्पादन म्हणून प्रसिद्ध आहे परंतु हवामान बदलाचा वारंवार संकट येत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान शोषावे लागत आहे. शेती पिकत नाही म्हणून विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतो ! मात्र काही शेतकरी प्रयोगशील शेती करून भरघोस उत्पन्न येणारे पीक घेऊन प्रचंड नफा कमावतात. असाच एक प्रयोग तुमसर तालुक्यातील बपेरा (आंबागड) येथील युवा शेतकरी प्रदिप बंधाटे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत त्याने शेतात डाळिंबाचे लागवड करून रोजगारावर मात करून भरघोस उत्पन्न घेतले.
वारंवार निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देतो व त्यामुळे त्याला नापिकीचा सामना करावा लागते सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकारचे शेती विरोधी धोरण तर दुसरीकडे निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांनी शेतीचा आता मार्ग बदलविला आहे. पारंपरिक शेतीला पाठ दाखवत तुमसर तालुक्यातील प्रदिप बंधाटे व अरविंद बंधाटे या दोघाभावांणी  २०१४ मध्ये या झाडाची लागवड केल्याचे सांगितले एकर मध्ये ३३० डाळिंबाचे झाडे लावले. दरवर्षी तीन ते चार लाखाचे उत्पन्न मिळतो.
औषधीयुक्त नवीन प्रजातीच्या  डाळिंबाचे लागवड करून त्यांची जोपासना करीत आहे. बंधाटे
यांना ही बाब विचारली असता त्यांनी सांगितले काहींनी त्याला डाळिंब शेतीसाठी मार्गदर्शन केले.    आपल्याला सुरवातीला मेहनत करावे लागते. त्यानंतर या फळबागाचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याचे सांगितले. जिवा अमृत खत वापरून हे झाड दरवर्षी फळे देतो. यामुळे या फळबागपासून प्रतिवर्ष तीन ते चार लाखांचा लाभ होण्याची शक्यता व शुन्य बजेटमध्ये शेती करत असल्याने शेतकऱ्याने वर्तविले आहे.
या नाविण्यपूर्ण शेतीची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतीला भेट देऊन डाळिंब शेतीची माहिती जाणून घेतली.
रासायनिक खतांच्या वारेमाप वापरामुळे होत असलेले शेतीचे नुकसान आणि उत्पादित माल निर्यात करण्यासाठी येत असलेला अडसर लक्षात घेऊन
गोमूत्र पासून जिवा अमृत  खतांच्या वापर करीत
तुमसर तालुक्यातील बपेरा (आंबागड) येथील प्रयोगशील शेतकरी प्रदीप बंधाटे यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सेंद्रीय खतांच्या जोरावर एक एकर जमिनीतून डाळिंबाचे तीन-चार लाख रुपयांचे उत्पादन मिळतो. भंडारा जिल्हा डाळिंब उत्पादक साठी अनुकूल नाही त्यासाठी शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच हवामानात होणार्‍या अचानक बदलाला सामोरे जाऊन डाळिंब उत्पादन घेणे सहजासहजी शक्य होत नाही. तेव्हा प्रदीप बंधाटे यांनी त्यांचे बंधू अरविंद बंधाटे यांचे मार्गदर्शन घेतले. आणि पारंपरिक शेतीला डावलून डाळिंब शेतीचा लागवड करून रोजगारावर मात केली आहे.