४ लाखांच्या सुगंधित तंबाखूसह ७२ लाखांचा कंटेनर जप्त

0
9

नांदेड, दि.20 : -अन्न आणि औषधी प्रशासनाने नांदेडच्या श्रीनगर भागात एका कंटेनर मधून बिदर (कर्नाटक) कडे जाणारा बंदी असलेला सुगंधी तंबाखू पकडला आहे. या तंबाखूची किंमत कमाल दराप्रमाणे ४ लाख रुपये आहे. कंटेनरसह एकूण ७५ लाख ६० हजारांचा ऐवज अन्न आणि औषधी प्रशासनाने जप्त केला आहे. काल मध्यरात्री ही कारवाई झाली.

दिनांक २० जुलैच्या मध्यरात्री अन्न आणि औषधी प्रशासनाचे अधिकारी सुनील जिंतूरकर, उमेश काळ आणि त्यांचे सहाय्यक संतोष कंकवाडा, रमेश जाधव आणि बालाजी यांनी नांदेड शहरातून जाणारा कंटेनर क्रमांक आर जे २४ जी सी १६४७ ची तपासणी केली. या कंटेनरमध्ये मिराज नावाच्या सुगंधी तंबाखूचा साठा होता. त्यात एकूण १८२० सुगंधीत तंबाखूचे बॉक्स होते. एका बॉक्सवर २२५ रुपये कमाल किंमत लिहिलेली आहे. त्यानुसार एकूण किंमत ४ लाख ९ हजार ५०० रुपये होते. तसेच कंटेनरची किंमत जोडून हा आकडा ७५ लाख ६० हजार रुपये होतो आहे, अशी माहिती सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. कंटेनर सोहनसिंग हामेरसिंह चितावत यांच्या मालकीचा आहे. हा कंटेनर राजस्थान येथील उदयपूर येथून आला होता आणि बिदर कडे जाणार होता