गोंदिया-बल्लारशा रेल्वेगाडीचा अपघात टळला,रेल्वरुळाला तडे

0
10

गोंदिया,दि.21ः- गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील बारभाटी रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वेरुळाला तडे गेल्याचे उघडकीस आले.गोंदियावरुन सकाळी 7.30 वाजता बल्लारशा पॅसेंजर रेल्वेगाडी क्रमांक 58802 ही रवाना झाली.सकाळी 8.30 वाजता सौंदड स्थानक सोडल्यानंतर चंद्रपूरकडे रवाना झाल्यानंतर बाराभाटी रेल्वेस्थानकावरुन गाडी जात असताना चालकाला संशय आल्याने गाडी थांबविली.तसेच एका प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्याने लगेच  रेल्वेरुळाला तडे गेल्याचे लक्षात आणून दिले.या घटनेमुळे रेल्वेप्रवाशामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान रेल्वेच्या वरिष्ठांना याबाबत माहिती विचारणा केल्यावर त्यांना मात्र याबाबतची माहिती नसल्याचे समोर आले.