मुख्य बातम्या:

परशुराम विद्यालयात शालेय निवडणूक

गोरेगाव,दि.२१ःः तालुक्यातील  परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे शालेय निवडणूका पार पडल्या.निवडणूक अधिकारी म्हणून पी.एम.चुटे यानी भुमिका पार पाडली.निवडणूक अधिकारी डी.डी.चौरागडे,टी.एफ.इडपाचे,कु.भारती बिसेन,कु.ममता गणविर,व्ही.एस.मेश्राम,बी.सी.गजभिये,पी.व्ही.पारधी,डी.एम.बोपचे यांनी काम पाहिले.मतदानानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुण दिली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share