मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

धान घोटाळ्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

भंडारा,दि.22ः- आघाडी शासनाच्या काळात २0१४ मध्ये जिल्ह्यात धान घोटाळ्याची शासनाने एसआयटीमार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपपत्र स्विकारल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली आहे.
धान घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने घोटाळ्याची व्याप्ती सांगितली होती. पोलिसांच्या हातात तपास असताना आरोपींना अटकपूर्व जामिन मिळण्यास तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोपामुळे शासनाने सीआयडीकडे प्रकरण सोपविले होते. मागील ३ वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत असताना शासनाने आरोपपत्रदाखल करण्याची परवानगी दिली.
जवळपास ६ हजार पानांच्या आरोपपत्रावर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर चर्चा करून आरोप मान्य नसल्याने प्रकरण न्यायालयाच्या चालविण्यात येऊ नये, असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरूवारी (दि.१९) न्यायालयाने आरोपपत्र स्विकारले असल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली.

Share