तिरोडा – गोरेगाव न.प.करिता १५ कोटी

0
14

तिरोडा,दि.22ः- स्थानिक तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायतीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे तिरोडा गोरेगाव विधान सभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुगंटीवार यांचेकडे निधीची मागणी केली असता त्वरित वित्तमंत्री महोदयांनी ठोक तरतुदीअंतर्गत गोरेगाव नगर पंचायतीकरिता १0 कोटी निधी दिला तसेच तिरोडा नगर परिषद हद्दीतील रस्ते दुरुस्ती करिता ५ कोटी निधी मंजूर केलेली आहे. त्यामुळे तिरोडा शहर व समस्या कामयस्वरूपी दूर होणार आहेत. ही निधी मंजूर केल्यामुळे तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी वित्तमंत्र्यांचे आभार मानले.

तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत हद्दीतील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. ठिकठिकाणी गिट्टी निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. शिवाय आता पावसाचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. अशावेळी वाहन चालकांचे अपघात घडतात. रस्त्यांवर चिखल तयार होवून रहदारी बाधित होते. सदर दोन्ही शहरांच्या हद्दीत असणाऱ्या काही रस्त्यांवरून तर पायी चालणेसुद्धा कठिण होते. मग वाहन कसे चालवावे, अशी समस्या निर्माण होते. सदर खड्डेमय उखडलेल्या रस्त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिक अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी शासन-प्रशासनाकडे करीत होते.
नेमकी हीच बाब हेरून आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रस्ते दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली.
यावर वित्तमंत्र्यांनी त्वरित ठोक तरतुदी अंतर्गत गोरेगाव नगर पंचायतकरिता १० कोटींचा निधी दिला. तसेच तिरोडा नगर परिषद क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीकरिता ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून दोन्ही शहरांतील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येईल व नागरिकांना रहदारीयोग्य रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.