सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फिल्म फेस्टिव्हल

0
7

सांगली,दि.23ः- सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी प्रोडक्शन व रिटच प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने एका आगळ्यावेगळ्या शॉर्टफिल्म फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रथमच शॉर्ट फिल्म बरोबर अल्बमसाँगचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शॉर्ट फिल्म किंवा अल्बम साँग कलाकारांना दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम छञपती शिवाजी एन्टरटमेंट व रिटच प्रौडक्शनच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.या फेस्टीव्हलचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे फेस्टीव्हलला आलेल्या सगळ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपञ देवून गौरवण्यात येणार आहे. अल्बम सा़ँग मधील कलाकारांना तसेच दिग्दर्शक व निर्माता त्यांना ही स्टेजवर बोलावून त्यांना प्रोजेक्ट प्रमोट करण्यासाठी पाच मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे.

असे असेल बक्षीसाचे स्वरुप…
फेस्टिव्हल चे बक्षीस  प्रथम क्रमांक 31000/- ,व्दितीय क्रमांक 21000/-,तृतीय क्रमांक 11000 /-

महोत्सवाची वैशिष्ट्य
महोत्सवामध्ये प्रामुख्याने अल्बम सॉंग, प्रमोज, लघुपटांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. सर्व लघुपट 30 मिनिटे किंवा त्या पेक्षा कमी कालावधीचे असतील. लघुपट सर्व भाषेतील स्वीकारले जाणार आहेत. सर्व लघुपटांचे स्क्रिनिंग केले जाईल. मराठी, हिंदी, इंग्लिश सोडून इतर भाषेतील लघुपतांना Subtitle असणे गरजेचे आहे.प्रत्येक अल्बम सॉंगच्या लीड रोलच्या कलाकाराला प्रोमोट केले जाणार आहे.

खालील प्रमाणे असतील पुरस्कार
सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ,सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट,सर्वोत्कृष्ट छायांकन,सर्वोत्कृष्ट संकलन सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट पटकथा ,सर्वोत्कृष्ट,सवांद,लेखक ,सर्वोत्कृष्ट,संगीत,सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बाल-कलाकार, सर्वोत्कृष्ट कॉमेडी कलाकार सर्वोत्कृष्ट ,मेक अप सर्वोत्कृष्ट वेशभूषा.