रुग्णसेवा हीच पांडुरंग सेवा – डॉ. अश्विनी धुप्पे

0
15
बिलोली,दि.23ः-बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथे आषाढ एकादशीच्या निमित्ताने मोफ़त रोगनिदान व औषधी वाटप शिबिर घेण्यात आले. शिबिरात  १६५ रुग्णांनी आपली मोफत तपासणी व रोगनिदानासह औषधींचा लाभ घेतला. रुद्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आपल्या वेगळ्या धाटणीच्या समाजसेवा व प्रबोधनातून परिचित असलेले कमलाकर जमदडे व डॉ अश्विनी पाटील धुप्पे यांच्या समन्वयाने आषाढ एकादशी चे औचित्य साधून मोफत रुग्णसेवा करण्याचा मानस ठेऊन सदर शिबिराचे आयोजन केले व त्यासाठी आवश्यक सेवा साहित्य मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी प्राध्यापिका व अंनिस च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या प्रा. सुलोचना मुखेडकर यांनी आरोग्य व व्यसनमुक्ती ह्या विषयावर मार्गदर्शन केले व सामाजिक उत्थान पर गीत गायन करून उपस्थितांना जनजागृती संदेश दिला .
ह्याप्रसंगी डॉ अश्विनी धुप्पे पाटील यांनी  बोलतांना म्हणाले की रुग्णसेवा करणे हा आमचा धर्म असून आज आषाढ एकादशी चे औचित्य साधून मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा भाव म्हणी घेत शिबिराचेआयोजन केले ज्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा करण्याची अनुभुती होत आहे तसेच भविष्यात ही अश्या प्रकारे सेवा करण्याचा मानस व्यक्त केला.
ह्याप्रसंगी रुद्रापूर चे सरपंच बाबाराव शेळके,  चंद्रकांत जमदडे, हवगिराव इंद्राक्षे, सिद्राम मुंके, रमेश मंगरूळे,अरुण जमदडे, अशोक नारलावर, आदींसह रुद्रापूर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.