नांदेडची भाविक महिला हेमकुंड यात्रेत मृत्युमुखी

0
7

नांदेड, दि.26 (बातमीदार) – नांदेड येथील रहिवाशी असलेल्या सतनामकौर वजिरसिंग जालनावाले या ६५ वर्षीय वृध्द महिलेचा मंगळवार (दि. २४ जुलै) रोजी सकाळी ८ च्या सुमारास उतराखंड राज्यातील शीख धर्मिंयांचा तीर्थ स्थल असलेल्या श्री हेमकुंट साहेबच्या यात्रे दरम्यान घोड्यावरुन पडून मृत्यु झाली. यामुळ नांदेड मध्ये हळहल व्यक्त करण्यात येत आहे. सतनामकौर वजिरसिंग जालनेवाले रा. नंदीग्राम सोसायटी मूळ निवासी जालना ह्या नांदेडच्या काही भाविकांसोबत १९ जुलै रोजी रेल्वे हेमकुंट साहेबच्या यात्रेवर गेले होते. सोळा हजार फुट उंचीवर बर्फाच्छादित पर्वतामधील गुरुद्वारा हेमकुंट साहेब येथे सतनामकौर यांनी ता. २३ रोजी दर्शन घेतले. सायंकाळी पर्वतावरुन खाली परतावेळी त्यांचे संतुलन बिगडून त्या घोड्यावरुन खाली कोसळले. ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर जबर मार बसले. त्यांना खाली आणून ऋृषिकेश येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण ता. २४ रोजी त्यांनी शेवटचे श्वास घेतले. त्यांचे पार्थिव विशेष वाहनांने नांदेडकडे पाठविण्यात आले असून ता. २६ जुलै रोजी दुपार पर्यंत ते नांदेडला पोहचण्याची शक्यता आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान नंदीग्राम सोसायटी येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून नगीनाघाट येथील शमशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पाठी मागे दोन मुलीं, एक मुलगा, सुन, जावाई आणि नातवंडे यांचा समावेश आहे.