‘पश्चिम बंगाल’ नव्हे ‘बांगला’, नाव बदलाचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर

0
13

कोलकत्ता ,दि.26(वृत्तसंस्था)- पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज(गुरुवार) राज्याचे नाव बदलण्यासाठी ठराव पास करण्यात आला आहे. आता पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्यात येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच हे नाव बदलण्यात येईल. बऱ्याच दिवसापासून राज्य सरकार याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्याचे नाव सर्व भाषांमध्ये बांगला असे बदलले जाईल. यापूर्वी पश्चिम बंगाल विधिमंडळाने 2016 मध्ये राज्याचे नाव इंग्रजित Bengal, बेंगालीमध्ये बांगला आणि हिंदीमध्ये बंगाल करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. पण केंद्राने हा प्रस्ताव परत पाठवला होता. त्यानंतर तिनही भाषांमध्ये बांगला असे एकच नाव बदलण्याचा ठराव विधिमंडळाने केला आहे. हा ठराव केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलून बांगला करण्याची पुढील प्रक्रिया केली जाईल.