संघावर विश्वास ठेवून अन्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संघात प्रवेश

0
26

गोंदिया,दि.26 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघद्वारे साई मंगलम लॉन आमगाव येथे १८ जुलै रोजी आमगाव तालुका शिक्षक मेळावा गटशिक्षणाधिकारी भोयर स्वागत सत्कार आमगाव तालुक्यात बदलून गेलेले व आलेले शिक्षकांचे स्वागत समारंभाचे तसेच जिल्हा कार्यकारिणीची सभा घेण्यात आली.सभेला संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे, राज्य संघाचे कार्याध्यक्ष विनोद राऊत, नुतन बांगरे, वीरेंद्र कटरे, अनिरूद्ध मेश्राम, यु.पी. पारधी, सुधीर बाजपेयी, केदार गोटेफोडे, एन.जे. रहांगडाले, नागसेन भोलराव, हेमंत पटले, वाय.एस. भगत, बी.बी. ठाकरे, अरविंद नाकाडे, शंकर नागपुरे, ओमेश्वरी बिसेन, योगेश्वर मुंगुलमारे, शंकर चव्हाण, पवन कोहळे, सुमेधा गजभिये, विजय डोये आदी मान्यवर उपस्थित होते. संघाच्या परंपरेनुसार सर्व मान्यवरांचे स्वागत मनोगत घेण्यात आले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व त्यानंतर संघाच्या कामात करण्याच्या पद्धतीवर व संघावर विश्वास ठेवून समितीचे अनेक पदाधिकारी यांनी राज्य नेते यांच्या उपस्थितीत संघात प्रवेश केला. संघात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. संघात प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेश रहांगडाले, एम.पी. नागपुरे, वरून दीप, आर.जी. मेश्राम, गणेश चव्हाण, वीरेंद्र कावळे, के.जी. रहांगडाले, एस.एम. येळे, एस.के. पाथोडे, गुलाब भुसारी, डी.टी. कडव, एन.एन. बिसेन, भीमराव डहाट, रवी खोब्रागडे, अकरम शेख, आर.सी. बिसेन, जी.टी. रहांगडाले, रमन हुमे, आर.एम. करंडे, राम सोनटक्के, आनंद सरवदे, एच.एम. रहांगडाले आदी कार्यकर्त्यांनी संघात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आमगाव तालुकाध्यक्ष गणेश चुटे, सचिव मयूर राठोड, रमेश भलावी, एन.एस. कोरे, सुनील मुरकुटे, डी.एफ. डोये, सांगोळे व त्यांची चमूने सहकार्य केले. सभेला तालुकाध्यक्ष दुर्गा कोकोडे, दिनेश बोरकर, विनोद चौधरी, जी.जी. खराबे, वाय.बी. पटले, नरेंद्र आगाशे, सचिव रमेश संग्रामे, डी.बी. लांजेवार, विनोद लिचडे, सुशील रहांगडाले, अमोल खंडाईत, टी.आर. लिल्हारे, पी.के. पटले, घाटघुमर दमाहे, पंचभाई हटीले, एन.जे. कटरे, एस.बी. बीरनवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. .