सपना साखलवार गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष

0
17

चंद्रपूर,दि.27 : जिल्ह्यातील गोँडपिपरी नगरपंचायतीचा नगराध्यक्षपदाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून काँग्रेस सेना युतीच्या सपना साखलवार यांनी बाजी मारली. भाजपच्या राकेश पूनचा एका मताने पराभव केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पराभव आमदार संजय धोटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नगरपंचायती मध्ये विशेष सभा बोलविण्यात आली. यानंतर मतदानाला सुरवात झाली. यात काँग्रेसच्या सपना साखलवार यांनी भाजपच्या राकेश पूनचा एका मताने पराभव केला व अध्यक्षपद पटकविले.

उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या शोभाताई संकुलवार यांना निवडण्यात आले. निकाल जाहीर होताच काँग्रेस सेनेच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून जंगी माहोल करण्यात आला.यावेळी नवनिर्वाचीत नगराध्यक्ष सपना साखलवार यांचे स्वागत करण्यात आले.राजूऱ्याचे नगराध्यक्ष अरूण धोटे,सुरेश चौधरी,तालूकाध्यक्ष तुकाराम झाडे,रवि साखलवार,शिवसेनेचे सुनील संकुलवार, संतोष बंडावार, राजू राउत, रामू कुरवडकर, शैलेश बैस, विपीन चौधरी यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.