अशोक चक्र धारण केलेल्या भारतीय सोन्याच्या नाण्याचा प्रस्ताव

0
19

नवी दिल्ली, दि. २८ – सर्वसामान्यांचा सोन्यात गुंतलेला जीव आणि सोने आयातीत खर्ची पडणारे परकीय चलन या दोन परस्परविरोधी गोष्टींची सांगड घालणारे पाऊल उचलताना गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम, गोल्ड बाँड्स आणि अशोक चक्र धारण केलेले सोन्याचे नाणे या तीन योजना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केल्या. भारत दरवर्षी सुमारे ८०० ते १००० टन सोने आयात करतो आणि भारतातील घराघरात असलेला सोन्याचा साठा २० हजार टनांच्या आसपास असण्याची अपेक्षा असल्याचा उल्लेख जेटली यांनी केला. त्याचप्रमाणे भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो याचा दाखला देत त्यांनी स्थानिक सोन्याला महत्त्व देण्याचा प्रस्ताव ठेवला असून अशोक चक्र असलेले सोन्याचे नाणे आणण्याचा प्रस्ताव ठेवला.
त्याखेरीज गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम आणि गोल्ड बाँड्सचाही प्रस्ताव जेटली यांनी मांडला आहे.
ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना त्याच्यावर काहीही परतावा मिळत नाही, मात्र आता सोने बँकांमध्ये ठेवून त्यावर काही प्रमाणात व्याज मिळण्याचा मार्ग सरकारने गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमच्या माध्यमातून आखला आहे.