राज्य परिवहन महामंडळाच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचा मोर्चा

0
11
मौदा,दि.27(प्रा.शैलेष रोशनखेडे)-राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातंर्गत येत असलेल्या व तालुकास्थळ असलेल्या मौदा येथील बसस्थानकावर भंडारा व रामटेक आगाराच्या बसेस नियोजित वेळेत बसस्थानकावर येत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.या प्रकरणाची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी संघटनेला होताच राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष निलेश कोढेच्या नेतृत्वात आज शुक्रवारला विद्यार्थ्यांनी मौदा तहसिल कार्यालय व बसस्थानकावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन सादर केले.मोर्चा बसस्थानकात नेण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केल्याने तहसिल कार्यालयाकडे वळविण्यात आला.तहसिलदार दिनेश निंबाळकर व रामटेक आगाराचे व्यवस्थापक घोंगे यांना निवेदन सादर केले.
 निवेदनात भंडारा आणि रामटेक आगाराच्या एसटी बसेस नियोजित वेळेवर बस स्थानकावर थांबा न येणे, बसेसमध्ये अपुरी जागा आणि गर्दीमुळे विध्यार्थांना बसस्थानकातच ताटकळत उभे राहावे लागत असल्याने बस फेर्यांची संख्या वाढविणे,ग्रामीण परिसरातून येणार्या बसेस मौदा बसस्थानकवर सकाळी सात वाजता पोहचायला हवे जेणेकरून विध्यार्थांना पहिल्या तासिकेला विद्यालयात वेळेवर हजर राहता येईल, बसेसच्या वेळापत्रकामध्ये  विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बदल करणे, मौदा बसस्थानकावार प्राथमिक सुविधांचा असलेला अभावांचा उल्लेख करण्यात आला आहे.
मौदा तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या मोर्च्यात सहभागी होऊन आपला रोष प्रकट केला. मोर्च्यामध्ये  राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष निलेश कोढे, तालुका अध्यक्ष आदम खान, महाराष्ट्र जनस्वराज्य पक्षाचे नागपूर विभाग प्रमुख राम वाडीभस्मे, डॉ प्रा गोपाल झाड़े डॉ, प्रा पोटफोड़े रोषण कुंभलकर, विश्वकुमार ठाकरे, कामेश्वर बारापात्रे, सौरभ पोटपोळे, अंकुर तिरपुडे, रोहित शिवरकर, रोषण शेंडे, देवेंद्र बोरीकर, शुभांगी वंजारी, शुभांगी मोंगल, राणी देवांगण, संध्या यादव, श्रुती मधुकर, महेश शाहू, मोहमद खान, मंगेश वाडे, आकाश पिसे, जीवन बर्ते  यांच्यासह सर्वच शाळा आणि विद्यालयातील जवळपास १५००  विद्यार्थी सहभागी होते.