बिलोली विकास कृती समितीच्या लाक्षणिक उपोषणास चांगला प्रतिसाद

0
10
बिलोली (सय्यद रियाज ),दि.27ः- प्रधानमंञी पिक विमा योजनेच्या आँनलाईन सर्वर मधून बिलोली शहराचे नाव वगळण्यात आल्यामुळे शहरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून याबाबत बिलोली शहर विकास कृती समितीच्या वतीने पुढाकार घेऊन.२७ जुलै रोज शुक्रवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.या आंदोलनास शहरातील बहूसंख्य शेतकऱ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
   तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने का होईना पिक विमा भरण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र पिक विमा भरण्याच्या आँनलाईन पोर्टलवर बिलोली शहराच्या नावाचा उल्लेखच नसल्याने  शहरातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची सोयच नाही.पिक विम्याच्या आँनलाईन पोर्टलवर बिलोली शहराचे नाव नसल्यामुळे शहरातील शेतकरी हे  शेतकरी नाहीत का ? शहरातील शेतकऱ्यांना अशी सापत्नीक वागणूक का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत बिलोली शहर विकास कृती समितीच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाधिका-यांना निवेदन देणे,जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना व आमदारांना प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांच्या अडचणी सांगून सतत पाठपुरावा करत असताना व पिक विमा भरण्याची मुद्दत अंतिम टप्प्यात आलेली असताना आँनलाईन पोर्टलमध्ये सुधारणा करून त्यात बिलोली शहराचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील संतृप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन बिलोली शहर विकास कृती समितीच्या वतीने दि.२७ जुलै रोजी येथील तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यासमयी बोलताना बिलोली शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष गोविंद मुंडकर यांनी शहरातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची सोय होत नसेल तर कृती समितीच्या वतीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे सांगितले.यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या लाक्षणिक उपोषणास कृती समितीचे गोविंद मुंडकर ,सुभाष पवार विजयकुमार कुंचनवार,भीमराव जेठे, शंकरराव अंकुशकर, माधव जाधव, मारुती पटाईत, गंगाराम गादगे, राम नरोड , बाबुराव देशमुख,श्रीधर एंबडवार, बसवंत मुंडकर्, मारुती मालुसरे, साईनाथ ईळेगावे, नागोराव चुनडे आदी सह बहूसंख्य शेतकरी व नागरिक उपोषणाला बसले होते.